"किल्ले सफर" बद्दल थोडेसे.....
सर्वप्रथम "किल्ले सफर" मध्ये आपले स्वागत आहे. किल्ले हे नेहमीच महाराष्ट्राचे अभिमान राहिले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर किल्ले महाराष्ट्राबाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. किल्ले नेहमीच आकर्षणाचे स्थान बनले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांना अनन्य साधारण महत्व होते. छत्रपतींनी अनेक किल्ले जिंकले. छत्रपतींना स्वराज स्थापन करायचे होते. त्याकरिता त्यांनी त्यांच्या जीवाचे रान केले. मावळ्यांना एकत्र आणले. त्यांच्यासाठी किल्ले अतिशय महत्वाचे असत. किल्ल्यांबद्दल सविस्तर इथे चर्चा करता येणार नाही, त्यासाठी स्वतंत्र लेख लिहिला जाईल.
हा ब्लॉग बनवण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
१. किल्ल्यांबद्दल माहिती जमा करणे आणि त्यांच्या बद्दल जास्तीत जास्त माहिती उपलब्द करून देण्याचा प्रयत्न करणे.
२. आम्ही ज्या किल्ल्यांना / गडांना भेट दिली आहे, त्यांच्याबद्दल माहिती पसरवणे. त्या गडावर कसे पोहोचणे, त्या गडावरील आकर्षणाची ठिकाणे कोणती, त्या गडाबद्दल थोडासा इतिहासाबद्दल माहिती करून देणे, इत्यादी.
३. सर्वात महत्वाचे म्हणजे किल्ल्यांच्या / गडांच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा