Pages

मंगळवार, डिसेंबर १७, २०१३

किल्ले राजगड ची सफर !


राजगडावरील सुवेळा माची वरील एक दृश.

किल्ले राजगडाबद्दल थोडीशी माहिती:

राजगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या कार्यकिर्दीतला एक अतिशय महत्वाचा किल्ला मनाला जातो. हा गड खरेच अतिशय उल्लेखनीय असून गडावर नक्की भेट द्यावी. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र मानले जाते. गडावर चढणे कठीण असून Trekking साठी उत्सुक असलेल्यांनी राजगडावर नक्की जावे. पण गड चढताना सावधगिरीने चढणे. गडावर अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. पद्मावती तलाव, रामेश्वर मंदिर, राजवाडा, सदर, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, पद्मावती मंदिर, बालेकिल्ला, काळेश्वरी बुरुज आणि परिसर, इत्यादी. पण सुवेळा माची, पद्मावती माची, संजीवणी माची आणि बालेकिल्ला हे अत्यंत विलोभनीय ठिकाणे आहेत. 

गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे:

१. बालेकिल्ला:

          बालेकिल्ल्याचे एक दृश.
                                                                                                    बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग.

    बालेकिल्ला हा राजगडावरील सर्वात उंच ठिकाण आहे. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे हि म्हणतात.

सोमवार, ऑगस्ट १२, २०१३

८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातील सासवड येथे आयोजित केले आहे.

             मित्रांनो......८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा पुण्यातील सासवडला होणार आहे. आचार्य अत्रे यांचे सासवड हे जन्मस्थान आहे. पुण्यातील सासवडमध्ये संमेलन होणार या बातमीने खूप आनंद होत आहे. कारण मी सुद्धा सासवडचाच आहे. साहित्य प्रेमींनी संमेलनासाठी सासवडला येऊन संमेलन यशस्वी करावे.
             बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे:
http://www.indianexpress.com/news/annual-marathi-literary-meet-to-be-held-in-pune-in-december/1141878/

 
             सासवडला आणि सासवड जवळ अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. जसे -
१. पुरंदर किल्ला 
२.कार्हेपठार
३. जेजुरी, खंडोबा मंदिर
४. पुरंदर वाडा
५. मल्हारगड
६. संगमेश्वर मंदिर
७.कानिफनाथ
८. पांडेश्वर मंदिर
९. संत सोपान काका मंदिर

रविवार, जुलै २८, २०१३

"Forts in Maharashtra" - A Documentary by Dr. Jabbar Patel


      "Forts in Maharashtra" (महाराष्ट्रातील किल्ले/गड) - डॉ. जब्बार पटेल यांनी बनवलेला हा माहितीपट नक्की पहा. हा माहितीपट १९९० साली बनवला गेला आहे. यात डॉ. जब्बार पटेल यांनी महाराष्ट्रातील अनेक किल्ले / गड दाखवले आहे. छान चित्रीकरण आणि उत्तम माहिती इंग्रजी मध्ये देण्यात आली आहे. YouTube वर हि माहितीपट  उपलब्द आहे. खाली या माहितीपटाची ची लिंक दिलेली आहे.



Forts in Maharashtra - Part 1


Forts in Maharashtra - Part 2


Forts in Maharashtra - Part 4


Forts in Maharashtra - Part 5
    

"किल्ले सफर" बद्दल थोडेसे.....

        सर्वप्रथम "किल्ले सफर" मध्ये आपले स्वागत आहे. किल्ले हे नेहमीच महाराष्ट्राचे अभिमान राहिले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर किल्ले महाराष्ट्राबाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. किल्ले नेहमीच आकर्षणाचे स्थान बनले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांना अनन्य साधारण महत्व होते. छत्रपतींनी अनेक किल्ले जिंकले. छत्रपतींना स्वराज स्थापन करायचे होते. त्याकरिता त्यांनी त्यांच्या जीवाचे रान केले. मावळ्यांना एकत्र आणले. त्यांच्यासाठी किल्ले अतिशय महत्वाचे असत. किल्ल्यांबद्दल सविस्तर इथे चर्चा करता येणार नाही, त्यासाठी स्वतंत्र लेख लिहिला जाईल.


        हा ब्लॉग बनवण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

१. किल्ल्यांबद्दल माहिती जमा करणे आणि त्यांच्या बद्दल जास्तीत जास्त माहिती उपलब्द करून देण्याचा प्रयत्न करणे.

२. आम्ही ज्या किल्ल्यांना / गडांना भेट दिली आहे, त्यांच्याबद्दल माहिती पसरवणे. त्या गडावर कसे पोहोचणे, त्या गडावरील आकर्षणाची ठिकाणे कोणती, त्या गडाबद्दल थोडासा इतिहासाबद्दल माहिती करून देणे, इत्यादी.

३. सर्वात महत्वाचे म्हणजे किल्ल्यांच्या / गडांच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न.